दुकानाच्या वादातून व्यक्तीवर चाकूहल्ला

हिंगणघाट : दुकानाच्या वादातून व्यक्तीला सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर चाकूने हातावर वार करून जखमी केले. मोहता चौकात ही घटना घडली.

संतोषसिंग गौतम यांनी किरायाने दिलेल्या दुकानात जात दुकान खाली करून द्या, असे म्हटले असता इंदू मोटवानी, मनोहर बलवानी, सुमित आहुजा, पप्पू मोटवानी, जितू मोटवानी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एकाने चाकू काढून त्यांच्या हातावर मारहाण करीत त्यांना जखमी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here