पवनार : येथील अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यां सर्व स्थरातील कोरोना योद्ध्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला. येथील उमा शंकर कार्यालयात हा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी येथील अखिल तेली समाज संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप चव्हाण, महाराष्ट्र कार्याअध्यक्ष सचिन देशमाने यांच्या हस्ते करण्यात आले. तर महाराष्ट्र प्रदेश समीक्षक विकास चिचंकर, महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख गुणवंत वाडीभस्मे, महाराष्ट्र प्रदेश संघटक अजित गवळी यांच्यासह आदी पदधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य विभाग, पत्रकार यांना कोरोना युद्धा म्हणून सन्मापत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सचिव वैशाली येरूनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार लवेश भुजाडे यांनी मानले.
कार्यक्रमला पवनार संघटक चंदु वाघमारे, अध्यक्ष मनिष हिवरे, उपाध्यक्ष किशोर सोनटक्के, सचिव लवेश भुजाडे, प्रसिद्धि प्रमुख गणेश हिवरे, सचिन धांदे, सतिश पानकावसे, लक्षम्ण उमाटे, रोशन सोनटक्के, महेश गोमासे, सेलु अध्यक्ष अर्चणा घुगरे, पवनार अध्यक्ष विजया पाहुणे, उपाध्यक्ष अर्चणा वंजारी, सचिव वैशाली येरूनकर , कलावंती लाडे, लिना पाटील, रंजना आंबटकर, रंजना ईखार, ज्योतीताई माजरे यांच्यासह गावातील नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.