शिधापत्रिकेवरील रॉकेलचा उल्लेख आता बेपत्ता!

झडशी : केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत घरोघरी गॅस सुविधा पुरविली. परिणामी, आता अनेकांच्या शिधापत्रिकावरील रॉकेलची नोंद कायमस्वरूपी वगळण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गृहिणींची धुरापासून कायम मुक्तता करण्यासाठी उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत घरोघरी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गॅस असलेल्या व्यक्तीला रॉकेल देण्यात येऊ नये, या शासनाच्या नियमामुळे शिधापत्रिकेवरून ही नोंद वगळण्यात आली आहे. घरात अनेक कामासाठी रॉकेलची आवश्‍यकता अद्यापही भासते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रॉकेलवरील दिव्यांचा आजही ग्रामीण भागात वापर होतो. इंजिनकरिताही रॉकेलची आवश्‍यकता असते. सद्य:स्थितीत सर्वांनाच रॉकेल पुरवठा बंद झाल्याने रॉकेल मिळत नाही. परिणामी, नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ ओढवली आहे. रॉकेलचा पुरवठा बंद झाला असला तरी मागणी कायम असल्याने रॉकेलसाठी ग्रामीण भागात संघर्ष करावा लागत आहे. रॉकेलसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here