वर्धा : येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाच्या ताफ्यात आनखी एक नविन वाहन दाखल झाले आहे.
परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांसाटी इंटरसेप्टर वाहनाची खरेदी या विभागाने केली आहे. येथील प्रभारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तुषारी बोबडे यांनी या वाहनाचे पुजन करुन या वाहनाला हिरवी झेंडी दाखविली.
रस्ता सुरक्षा निधीमधून हे वाहण खरेदी तसेच सदर वाहनांमध्ये उपकरणे खरेदी करण्यात आलेली आहे. महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रा या वाहन उत्पादकांकडून स्कारपिओ स्टेज ५ या मॉडेलची खरेदी करण्यात आली आहे. सदर इंटरसेप्टर वाहनांमध्ये मेडिकल सेन्सर्स, लेसर कॅमेरासह लेसर आधारित स्पीड गन, अल्कोहोल श्वास विश्लेषक, टिंट मीटर ही उपकरणे बसविण्यात आलेली आहे. यामुळे वाहणामुळे वाहन तपासणीस गती येणार आहे.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या येथील प्रभारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तुषारी बोबडे, वाहन निरिक्षक नरेन्द कठाणे, गोपाल धुर्वे, विशाल मोरे, उपप्रादेशिक कार्यालयाचे कर्मचारी वरिष्ठ लिपिक विजया नगरकर, अमिता टेकाडे, विश्वास गावंडे, सुनिल सिरसाट, भास्कर कापडे, शेखर रामटेके, अमोल रघाटाटे, रुपाली बोंदरे, सचिन धानमोडे, घनशाम घोडके, पांडूरंग वाघमारे, नरेन्द तिवारी, घनशाम टिक्कस यांची उपस्थिती होती.