

वर्धा : अल्पवयीन मावसबहिणीवर अत्याचार केल्याची लज्जास्पद घटना सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याची माहिती सेलू पोलिसांनी दिली आहे.
अल्पवयीन पीडिता ही तिच्या आजीकडे राहण्यास गेली होती. रात्रीच्या सुमारास ती झोपली असताना तिच्याच भावांनी तिचा लैंगिक छळ केला. ही बाब पीडितेने तिच्या आईलाही सांगितली. मात्र, ते नातलग असल्याने पीडितेच्या आईने ही बाब कुणालाही सांगितली नाही. तर आरोपींना समजावले.
मात्र, तरी देखील पीडितेचा लैंगिक छळ आरोपींनी केल्याने पीडितेच्या आईने याप्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सेलू पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.