वर्धा : वरुड येथे रेल्वे क्रॉसिंग जवळ नवीन बाधण्यात आलेल्या उडान पुलाखाली पावसाळ्यात पाणी साचून राहत असल्यामुळे या रस्त्याने जाणे – येणे करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी संबंधीत विभागाला वारंवार निवेदन दिले मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज 1 सप्टेंबर रोजी नागरिकांनी टायर जाळून संबंधीत विभागाचा निषेध केला आहे.
वरुड येथून सेवाग्राम रुग्णालय जवळ असल्याने रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांना आणि गावाकऱ्यांना या पाण्याचतून पायदळ वाट काढावी लागत आहे, तर काहींना रेल्वे लाईन वरून दुचाकी उचलून घेऊन आपली वाट काढावी लागत आहे, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, याकडे संबंधीत विभागाने लक्ष देवून समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.