

समुद्रपूर : जाम नाजीकच्या साईराम हॉटेळजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडला.
नागपूर जिल्ह्यातील सातगाव येथील मारोती श्यामराव भोयर हे एम. ‘एच. ४० डब्ल्यू. ४९५८ क्रमांकाच्या दुचाकीने उबदा येथून जाममार्गे बुटीबोरीकडे जात होते. वाहन साईराम हॉटेलजवळ आले असता भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात मारोती भोयर हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीचे स्नेहल राऊत, सुधाकर बावणे, अजय बेले, गौरव खरवडे, भारत पिसुट्ठे, आशिष धमाने, प्रदीप डोंगरे, सुनील श्रीनाथे, गणेश पवार यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयाकडे रवाना केले. या अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे. आरोपी वाहनासह वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.