माझ्या घरची वीज सुरू कर, अन्यथा पूर्ण गावाची बंद करा! उपकेंद्रात राडा; तक्रार दाखल

वर्धा : माझ्या एकट्याची लाईन मागील २४ तासांपासून बंद आहे. एक तर लाईन सुरु कर, अन्यथा संपूर्ण गावाची लाईन बंद कर, असे म्हणत दोघांनी मदनी येथील 33 केव्ही वीज उपकेंद्रात धिंगाणा घालून यंत्रचालकासह सुरक्षा रक्षकास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सेवाग्राम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यंत्रचालक धनराज बलदेव इरपाची हे कर्तव्यावर असताना करंजी भोगे येथील रहिवासी राहुल कडू याचा फोन आला. राहूलने माझ्या घराची लाईन बंद असल्याचे सांगितले. तत्काळ लाईन सुरु करा, अन्यथा संपूर्ण गावाची लाईन बंद करा, असे वारंवार तो म्हणत होता. तेव्हा धनराज याने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळाने राहूल कडू आणि एक व्यक्ती दोघेही उपकेंद्राच्या लोखंडी फाटकावरुन उडी घेत उपकेंद्रात शिरुन यंत्रचालक धनाराज याला धक्काबुक्की केली तसेच सुरक्षरक्षकासही मारहाण केली. बळजबरीने कंट्रोल रुममध्ये प्रवेश करुन वीज पुरवठा बंद करण्याची बटण शोधत होता.

मात्र, त्याला बटण मिळाली नसल्याने त्याने यंत्रचालकासह सुरक्षा रक्षकास जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. अखेर धनाराज याच्या तक्रारीनुसार सेवाग्राम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सेवाग्राम पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here