पवनार : येथील आरोग्य उपकेंद्रात इक्विटास स्मॉल फायनान्स बँक यांच्या वतीने आरोग्य साहित्य भेट म्हणुन देण्यात आले. गणेश बावणे यांच्या हस्ते समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय इंगळे यांना देण्यात आले.
भेट दिलेल्या वस्तूमध्ये सॅनिटायझर स्टँड, मास्क, सॅनिटायझर, हातमोजे इत्यादी आरोग्य विषय वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी आनंद पिलारे, संगीता भट, पदाधिकारी, कर्मचारी अशा सेविका यांची उपस्थिती होती.