आष्टी (शहीद) : १८ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकानांत चोरी करीत मुद्देमाल ल॑पास केला होता. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या २४ तासांत चोरी करणाऱ्या दोन विधिसंघर्षग्रत बालकांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला.
चोरट्यांनी गजानन किराणा स्टोअर, खान मेडिकल, भारत गॅस एजन्सीचे दुकान, तसेच नगरपंचायतीच्या गोदामाचे कुलूप तोडून साहित्य व रोख घेऊन पसार झाले होते. याचा तपास सुरू असतानाच बसस्थानक परिसरात एक मुलगा संशयीतरीत्या फिरताना मिळून आला. पोलिसांनी विधिसंघर्षय़रत बालकास ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखविताच सहकाऱ्यांसोबत दुकाने फोडल्याचे कबूल केले.
यावेळी पोलिसांनी १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामधील दुसऱ्या आरोपीला अटक केली. हे दोन्ही आरोपी विधिसंघर्षग्रत असून, त्यांनी तळेगाव येथेही अनेक चोऱ्या केल्याची कबुली दिली. ही कारवाई प्रभारी ठाणेदार आशिष गजभिये, पोलीस उपनिरीक्षक देवीदास ठमके, अमित जुवारे, गजानन वडनेरकर, राहुल तेलंग, निखिल वाने, अतुल टेकाम, मंगेश भगत, अक्ष्वीन ढाले यांनी केली.