वर्धा : घरबांधकाम ठेकेदाराने शेतकऱ्यास अतिरिक्त एक लाख रुपयांची मागणी केली. इतकेच नव्हेतर पैसे न दिल्यास कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. ही घटना बॅचलर रोडवर असलेल्या खडसे लेआऊट परिसरात घडली.
अमित भोसले शेतकरी असून त्याने बांधकाम ठेकेदार मनीष गांधी याला बांधकामाचा ठेका दिला. ठरल्याप्रमाणे गांधी याला ५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कमही दिली. मात्र, बुधवारी दुपारच्या सुमारास मनीष गांधी हा घरासमोर आला आणि शिवीगाळ करु लागला. मला एक लाख रुपये अतिरिक्त दे नाही तर तुझ्यासह कुटुंबातील सदस्यांना जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. दरम्यान भोसले याने कशाचे एक लाख रुपये देऊ असे म्हटले असता मला एक लाख रुपये सकाळी ११ वाजेपर्यंत दे अन्यथा जीवे ठार मारेन, असे म्हणून शिवीगाळ केली.