

वर्धा : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुख्य पुतळ्याजवळ जिल्ह्याची सार्वत्रिक भिमजयंती साजरी होते, बुध्द पहाट, सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रम तसेच पुतळा परिसरातील जिल्हा स्टेडीयममध्ये १५ ऑगस्ट व २६ जानेवारी राष्ट्रीय सणात शहरातील हजारो विद्यार्थी व नागरिक एकत्रित होतात असे अनेक कार्यक्रम त्याठिकाणी संपन्न होतात. मात्र प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुख्य पुतळा हटविण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप आंबेडकरवादी संघटनांनी केला याच्या विरोधात उद्या भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकनार आहे. सकाळी १० वाजता बजाज चौक येथून आंदोलनाची सुरवात होणार आहे.
शहरातील मुख्य पुतळा म्हणून लौकीक असणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळा परिसराचे सौदर्यीकरण करण्यात आले आहे. जेथे महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनाची भिंती चित्राचे विद्रुपीकरण या पेट्रोल पंपामुळे होणार आहे.
या पुतळ्याच्या बाजुला होणाऱ्या पेट्रोल पंपाच्या सर्व परवानग्या अवैद्य असुन पोलीस प्रशासनाने या सर्व परवानग्या दबाव टाकुन आणि खोटी माहिती देवून प्राप्त केल्या आहेत. संवेदनशिल ठिकाणी ज्वलनशिल उद्योग उभारुन शासनाला काय आंबेडकरी समाजाला व वर्धा वासियांना जाळायचे तर नाही ? हा संशय सुध्दा येतो. असा आरोप संघटनांचा आहे.
हा पुतळा केवळ एक प्रतिक नसुन आंबेडकरी जनतेची प्रेरणा आहे, प्राण आहे, चेतना आहे अशा पुतळ्याच्या परिसराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी शासन प्रशासनाची दडपशाही हाणुन पाडण्यासाठी या भव्य मोर्चामध्ये स्वयंप्रेरणेने मोठ्या संख्येने १५ ऑगस्टला शासनाचा व प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी बजाज चौक ते आंबेडकर चौक पर्यंत होणाऱ्या भव्य मोर्चा मध्ये सहभागी व्हा असे आवाहन पेट्रोल पंप हटाव कृती समितीने केले आहे.
पेट्रोल पंप हटाव कृती समितीतील या संघटनांचा सहभाग
१) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया २) बहुजन समाज पार्टी ३) वंचित बहुजन आघाडी ४) समता सैनिक दल ५) भारतीय बौध्द महासभा ६) संभाजी ब्रिगेड ७) भिम आर्मी ८) भिम टायगर सेना ९) झलकारी सेना १०) निर्माण सोशल फोरम ११) संबुध्द महिला संघटना