विरूळ (आकाजी) : नागपंचमीच्या दिवशी पुलगाव पोलिसांचे सहकार्य मिळताच सकाळी ६ वाजता पासून विरूळ येथीळ महिला मंडळाने लालखेड गावच्या जंगल परिसरात वागधरा शिवारात अवैध दारूभट्ट्यांवर धडक देवून मोहा, सडवा व 3५ लीटर गावठी दारू नष्ट केली.
यावेळी पुलगाव ठाण्याचे कर्मचारी पंकज टोकोणे, संजय पटले, संदीप जाधव, दारूबंदी मंडळाच्या अध्यक्ष अश्विनी रोडे, पोलीस पाटील निरज तुरके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेंद्र बुराडे, सुभाष चवरे, मधुकर बमनोटे, मंगेश वाकेकर, विक्रांत नाने, मिचकिने, प्रणय कोहाड, ताई पंधराम, सुनीता रोडे, वनीता रोडे आदी सहभाग झाले होते. रोहणा परिसरातही संपूर्ण दारूअड्डे बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रोहणा गावात जागोजागी अवैध दारूबंदी सुरू झाली असल्याने महिलांना त्रास होत आहे. बसस्थानकावरच दारूविक्री सुरू आहे.