सिंदी (रेल्वे) : जागतिक स्तरावर मूलनिवासी समाजाला त्यांच्या हक्क,अधिकार,रितीरिवाज परंपरा ला संरक्षण मिळावे याकरिता UNO द्वारा 9 ऑगस्ट हा जागतिक मूलनिवासी दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जागतिक मूलनिवासी दिवस साजरा करण्यात आला. आदिवासी दिनानिमित्त गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने भव्य जाग्रुती मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरवात समुद्रपूर येथून करण्यात आली. सदर रॅली सिंदी रेल्वे, केळझर, कोटम्बा, सेलू, जुनापाणी बिरसा नगर, सहित वर्धा शहरातील प्रमुख चौकातून फिरून वसंतराव किरनाके यांच्या घरील सप्तरंगी ध्वज ला वंदन करून रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅली दरम्यान कोटम्बा येथे गों.ग.पा. च्या वतीने वृक्षारोपण चा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. रॅली मध्ये दमडुजी मडावी किसान सेल प्रदेशाध्यक्ष, भीमाभाऊ आडे प्रदेश संघटक,विठ्ठल उईकें प्रदेश संपर्क प्रमुख, सचिन मसराम जिल्हा कार्याध्यक्ष, प्रवीण मसराम जिल्हा उपाध्यक्ष, अजित इरपाते सेलू तालुकाध्यक्ष, गजानन आत्राम गोविंदा मडावी, प्रवीण मडावी प्रफुल मेश्राम, शुभम उईके, गणेश सरियाम, प्रवीण सराटे, विशाल सुरपाम, अजय मरापे, पंकज किन्नके, नितेश कन्नके,मुकेश चिडाम,सुरेश सडमके, गजानन कोराम, सुरज सडमाके, प्रवीण नैताम, रावबा मसराम, मनोहर मडावी, राहुल मसराम, आशिष पेंदाम, शुभम मसराम, ईश्वर पोरताके,शरद उईके,अंकित मडावी, गणेश मडावी, राकेश मडावी, प्रदीप मडावी, राजू धुर्वे, आदित्य मडावी, रितीक मडावी, प्रफुल तोडासे, रोशन चिकराम, रुषभ सयाम, सुरज पराची,किरण वरठी,अनिल कुडमथे, महेश तुमडाम, मयूर उईके, तथा असंख्य पदाधिकारी विविध तालुक्यातून सहभागी झाले होते.