वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमा अंतर्गत शुक्रवार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 7.15 वाजता मेजर ध्यानचंद क्रीडांगणावर ‘फिट इंडिया फ्रीडम रन 2.0’ (फिटनेसचा डोज़, अर्धा तास रोज) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल करतील.
भारत सरकारच्या वतीने ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम देशभरात आयोजित केला जात आहे. या अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान गांधी जयंती पर्यंत (2 ऑक्टोबर 2021) जारी राहील. विश्वविद्यालयात आयोजित होणा-या या कार्यक्रमात प्रकुलगुरु द्वय प्रो. हनुमान प्रसाद शुक्ल आणि प्रो. चंद्रकांत रागीट, कुलसचिव कादर नवाज खान, अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी होतील.