वर्धा : अतिमद्यप्राशानामुळे एकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. नीतेश वाल्मिक वाघाडे (५३) रा. सोंडलापूर करंजी (काजी) जि. वर्धा असे मृतकाचे नाव आहे.
नीतेश हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. सोमवारी नीतेश याने जास्त दारू पिल्याने त्याची प्रकृती अचानक खालवली. त्यानंतर त्याला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात देशी, विदेशी तसेच गावठी दारूची खुलेआम विक्री होत आहे. असे असले तरी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभाग केवळ नाममात्र कारवाई करीत असल्याने दारू विक्रेत्यांचे मनोधैर्य सध्या वाढत आहे.