मोहता गिरणी कामगारांना आमदार कुणावार यांनी केले जीवनावश्यक वस्तुंचे वितरण! सणासुदीच्या काळात नगदी स्वरुपात दिली पाचशे रूपयांची मदत

हिंगणघाट : शहर हि श्रमिकांची वस्ती आहे, या शहरातील जुन्या काळातील मोहता गिरणी आता व्यवस्थापणाने बंद केली असून तेथे काम करणारे श्रमिक तसेच त्यांचे कुटुंबिय निराधार झाले आहेत,अशा निराधार कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून जवळपास २ हजार रुपये किंमतीचे जीवनावश्यक वस्तुचे किटवितरण तसेच नगदी स्वरुपात पाचशे रूपयाची मदत करीत असल्याचे प्रतिपादन करीत या निराधार झालेल्या कामगारांच्या पाठीशी सदैव राहणार असल्याचे आमदार समिर कुणावार यांनी सांगितले.

स्थानिक संत कंवरराम भवन येथे आयोजित ६०० कामगारांना जीवनावश्यक वस्तु वितरणप्रसंगी आ.कुणावार बोलत होते. यावेळी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतांनी,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अंकुश भाऊ ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर भाऊ दिघे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव आंबटकर, आर पी आय चे शंकरराव मुंजेवार, नगरसेविका सौ. छाया ताई सातपुते, सौ. रवीलाताई आखाडे, सौ.वंदना कामडी,पदमाताई कोडापे, शुभांगी ताई सुनील डोंगरे, समाजसेवक सुनील डोंगरे,नगरसेवक चंद्रकांत मावळे, राहुल सोरटे, किरण वैद्य, संजय बोथरा, भाजपा शहर अध्यक्ष आशिष परबत, नगरसेविका वैशाली सुरकार, सौ. शारदा ताई पटेल, नगरसेविका सौ सुनीताताई मावळे तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, समुद्रपुर तालुकाध्यक्ष संजय डेहणे, शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. अनिताताई मावळे,स्टार प्रचारक राकेश शर्मा, बालूभाऊ वानखेडे तसेच शेकडो आर एस आर मोहता गिरणीचे कामगार तसेच कर्मचारी सदस्य उपस्थित होते.

सणासुदीच्या काळात आमदार कुणावार यांचेवतीने कामगारांना २ महीने पुरेल एवढ्या अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तु व नगदी स्वरुपात ५०० रुपये मदत मिळाल्याने कामगार यावेळी समाधान व्यक्त करतांना दिसत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here