वर्धा : विविध मागण्यांकरीता जिल्हाधिकारी कार्यालायाजवळ आशा, गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी, आशा, शालेय आहार कामगारा या योजना कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा. घरकाम कामगारांची नोंदणी करून दरमहिना 1500 रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा, त्यांचा मुलांना शिष्यवृत्तीची योजना लागू करा. त्यांना मोफत राशन देण्यात यावे. आशा विविध मागण्यासाठी आंदोलनल करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी भैय्याजी देशकर, अर्चना घुगरे, देवेंद्र शिंनगारे, जगन चाभरे यांच्यासह इतर पदधिकारी तथा शेकडो आशा सेविका उपस्थित होते.