वर्धा : गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार वर्धा शहरातून तसेच लोहारा जिल्हा यवतमाळ येथून दुचाकी चोरी गेलेल्या तक्रारी संदर्भात पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या विशेष मार्गदर्शनात विशेष पथक तयार करून दुचाकी चोरी संबधाने पथकास सूचना देण्यात आल्या होत्या, सदर पथक शहर परिसरात प्रेटोलींग करित असताना त्यांना मिळालेल्या गोपीनिय माहितीवरून पंकज मेसेकर राहणार लोहारा जिल्हा यवतमाळ यास ताब्यात घेऊन त्याला विचार पूस केली असता, त्याचा साधीदार नितेश राहणार वर्धा यानी वर्धा व यवतमाळ येथून दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.
दोन्ही गुन्ह्यातील मोटर सायकल ते स्वतः वापरत होते, त्याच्या ताब्यातून दोनीही वाहन एकूण किंमत 60 हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. आणि दोन्ही आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात वर्धा गुन्हे शाखेने केली आहे. पुढील कारवाई करिता दोन्ही आरोपीना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.