राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला निर्णय! विद्यार्थ्यांना पोषण आहारासह मिळणार आता पौष्टिक काप

नंदोरी : राज्यात शालेय पोषण आहार योजनेस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना आता अतिरिक्त पोषण मूल्य असलेली न्यूट्रिटिव्ह स्लाइस देण्याचा निर्णय राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची माहिती सादर करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप केले जात होते. त्यासह आता चिक्कीसारखा पदार्थ पौष्टिक काप देण्यात येणार आहे. न्यूट्रिटिव्ह स्लाइसचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठादारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुरवठादारांकडून उपलब्ध झालेल्या न्यूट्रिटिव्ह स्लाइस राज्यातील शाळांना पुरविल्या जातील. शाळास्तरावरून त्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे प्रस्तावित आहे. विद्यार्थ्यांना वाटप करण्याच्या नियोजनासाठी संचालनालयाने शिक्षणाधिकाऱ्यांककून माहिती मागवली आहे. यात पहिली ते आठवीच्या वर्गाची असलेली जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, शासकीय आणि खासगी अनुदानित शाळा यापैकी कोणत्या व्यवस्थापनाची आहे, तशी माहिती घेऊन आहारसाठा पुरवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here