विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

आकोली : येथील युवकाने मंगळवारी सायंकाळी विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच तात्काळ वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतानाच रात्री पावणे अकरा वाजता त्याचा मृत्यु झाला. अनिल संजय पोहाणे (२५, रा आकोली) असे या मृत युवकाचे नाव आहे.

त्याने आत्महत्या करण्याकरिताच मंगळवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान विष प्राशन केले नागरिकांना लक्षात येताच लगेच त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बुधवारी शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आला त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा आप्त परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही कळले नाही. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here