

चिकणी : हिंगोली जिल्ह्यातून पपई घेऊन वर्धा जिल्ह्यात येत असलेला मालवाहू केळापूर शिवारात अनियंत्रित होत उलटला. यात वाहनातील दोघे व्यक्ती थोडक्यात बचावले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बासमत जिल्हा हिंगोली येथून एम. एच. ३८ एक्स. ०८२० क्रमांकाचा मालवाहूद्रारे वर्धा जिल्ह्यात पपई आणली जात होती. भरधाव मालवाहू वर्धा मार्गावरील केळापूर शिवारात आले असता अचानक वाहनाचा टायर फुटला. वाहनावर नियंत्रण मिळवताना वाहन उलटले. या अपघातात वाहनातील सैय्यद फारूख शेख व त्याचा एक साथीदार थोडक्यात बचावला; परंतु, मालवाहूचे तसेच वाहनातील शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.