आर्वी : युवकाने ड्रग्सचा ओव्हर डोस घेतल्याने त्याचा अमरावती येथे मृत्यू झाला. याबाबतची केसडायरी आर्वी पोलिसांना प्राप्त झाल्याने आर्वी पोलिसांनी नोंद घेतली आहे.
आर्वी येथील दगडी पुलाजवळील रहिवासी राकेश रविंद्र मेहरे याला ड्रग ओव्हरडोस मुळे अमरावती येथेली मेडिकल कॉलेज अमरावती येथे मृत्यू झाला. मृतक हा आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्याचे प्रकरण व्हिसेरा बॉटल, सीलबंद ब्लड सॅम्पल आदी सर्व साहित्य आर्वी पोलिसांना वर्ग करण्यात आले. यावरुन आर्वी पोलिसांनी नोंद घेतली आहे. पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहे.