सेलू : तालुक्यातील श्रीक्षेत्र घोराड येथून दरवर्षी वारकरी पायी चालत पंढरपूर ला जात होते येथून श्री संत केजाजी महाराजांच्या नावाने पायदळ दिंडी निघत होती परंतु गेली 2 वर्ष कोरोना महामारीमुळे या दिंड्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे भाविकांची वारीची परंपरा खंडित झाल्याने घोराड येथील युवकांनी पुढाकार घेत आज घोराड ते पंढरपूर सायकल दिंडी काढली. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास संत केजाजी महाराज मंदिरा समोरून दिंडीचे प्रस्थान झाले.
यावेळी राम कृष्ण हरी, केजाजी महाराज की जय या जयघोष करून ह.भ.प. नितीन महाराज बोकडे, सारंग महाराज तेलरांदे, शुभम महाराज पिसे, संदीप महाराज महाकाळकर मार्गस्थ झाले हे वारकरी दररोज 120 किमी अंतर सायकल ने चालणार आहे यावेळी ज्ञानेश्वर डोळसकर, पुरुषत्तम गुजरकर, गणेश खोपडे, माणिक खराबे, प्रफुल हांडे शुभम पिसे, साहिल तेलरांध्ये व उपस्थित गाववासीयांनी पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.