वर्धा : शालेय पोषण आहार व अंगणवाडी पुरक पोषक आहार कर्मचारी वर्धाच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासामोर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत आनदोलन करण्यात आले. प्रलंबीत मागण्या तात्काळ निकाली काढाण्यात याव्या या मागणीसाठी सीटूच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या माध्यमातून भारतीय श्रम परिषद, आय.एल.सी. ४५-४६ व्या अधिवेशनाच्या शिफारशीनुसार शालेय पोषण आहार यांना कामगार म्हणून मान्यता द्यावी. विमा, पी.एफ. व पेन्शन योजना लागू करावी, कामगार विरोधी कायदे रद्द करावे, सेट्रल किचन पध्दती रद्द करा यांसह विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा महिला बालविकास मंत्री यांना देण्यात आले.
यावेळी सीटूचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, जिल्हा सचिव, भैयाजी देशकर, अध्यक्ष अर्चना घुगरे, सरला चहांदे, वैशाली मुंजेवार, शम्मीम पठाण, भय्याजी देशकर, वंदना भगत, वंदना दुर्वे यांच्यासह कर्मच्यार्यांची उपस्थिती होती.