वर्धा : कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम हे जागतिक लेव्हलवर नामांकित रुग्णालय आहे. महात्मा गांधी यांच्या पावन भूमीत सर्व सामान्य जनतेसाठी आणि रुग्णालयात मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी स्मशानभूमी नाही ही शोकांतिका आहे. या ठिकाणी स्मशानभूमीकरिता जागा उपलबद्ध करून द्यावी, अशी मागणी बसपाच्या वतिने कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव श्री गर्ग यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सेवाग्राम येथील नागरीकांनी याबाबत वारंवार निवेदन देऊन स्मशाभुमीकरीता जागा मिळावी अशी मागणी केली. या स्मशानभुमीस खरांगना गोडे रोडवरील आपल्या संस्थेची थोडी जागा मिळाल्यास नागरीकांचा हा प्रश्न सुटू शकतो. आपण सामाजिक बांधीलकीतून सेवाग्राम ग्रामवासियांच्या भावनेचा विचार करून स्मशानभूमी करिता जागा उपलबद्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. बसपाचे जिल्हा अध्यक्ष मोहन राईकवार यांनी या संदर्भात कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव श्री गर्ग साहेब यांच्याकडे मांडून समस्या सोडविण्याकरीता निवेदन सादर केले.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाअध्यक्ष मोहन राईकवार, अनोमदर्शी भैसारे महासचिव, दिनेश वाणी संघटनमंत्री, विजय ढोबळे बी.व्ही. एफ संयोजक, जगदीश कांबळे, राज खेडकर, अरविंद पाटील हरिदास मेंढे, गणेश ताकसांडे यांची उपस्थित होते.