

आर्वी : उधारीच्या पैशाच्या वादातून युवकास दोघांनी काठीने मारहाण करीत जखमी केले. रोहणा परिसरातील धाब्यासमोर ही घटना घडली.
कुलदीप विजय पांडे हा रस्त्याने जात असताना रुपेश मदणे हा भेटला त्याने कुलदीपला तुझ्याकडे ५० रुपये उधारी आहे कधी देतो, असे म्हटले असता पैसे नाही नंतर देतो, असे कुलदीपने सांगितले. दरम्यान रुपेशने शिवीगाळ सुरु केली. काही वेळाने तेथे सिट्या नामक युवक आला व त्याने आणि रुपेशने कुलदीपला काठीने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहे. आर्वीसह परिसरात जुन्या वादातून हल्ले, मारहाणीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असल्याचे चित्र आहे.