

हिंगणघाट : येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक समस्या आहेत सध्याच्या कोविडच्या भिषण काळातही या उपजिल्हा रुग्णालयातील अनेक त्रुटी दूर करण्यासाठी शासनस्तरावरून कोणतीही हालचाल होत नाही. या समस्या तात्काळ सोडविल्या नाही तर तीन दिवसाचे उपोषण करण्याचा इशारा प्रहारचे पूर्व विभाग प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांनी आज उपविभागीय अधिकार्यांना निवेदनातून दिलेला आहे.
गजू कुबडे यांनी निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, येथील उपजिल्हा रुग्णालयात पोष्टमार्टेम करणारा कोणताही कायम स्वरूपी कर्मचारी नसल्याने मृतकाच्या नातेवाईकांना विनाकारण अनेक तास आपल्या प्रिय व्यक्तीचे पार्थिव घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे नातेवाईकांना विनाकारण मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो.
त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या उपजिल्हा रुग्णालयात पुर्णकालीन प्रसूती तज्ञ नसल्याने अनेक प्रसूतीकाना एकतर येथील खासगी दवाखाण्यात भरती होऊन महागडा खर्च करावा लागतो किंवा सावंगी अथवा सेवाग्राम येथे नाईलाजाने जावे लागते. यातच एखादी महिला गंभीर अवस्थेत असेल तर तिला आपला जीवही गमवावा लागतो. अशीच दुर्दैवी घटना येथील रुग्णालयात चार ते पाच महिन्यांपूर्वी घडली आहे. त्याच प्रमाणे येथे फिजिशियन ही महत्वपूर्ण जागा मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना तपासणी अभावी अन्यत्र जावे लागते.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेले परंतु परसेवेवर मागील अनेक वर्षांपासून दुसरीकडे आपली सेवा देणाऱ्या दोन वैद्धकीय अधिकाऱ्यांना तात्काळ या ठिकाणी वापस बोलविण्यात यावे किंवा त्यांची येथील सेवा खंडित केल्यास या दोन जागा रिक्त होईल त्यामुळे सरकारला नवीन जागा भरता येतील त्यामुळे अनेक गरजू व गरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल.
या अतिशय महत्वाच्या गंभीर विषया बाबत सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या महत्वपूर्ण प्रश्नाकडे त्वरीत लक्ष दिल्यास येथील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, गिरणी कामगार व अत्यल्प उत्पन्न गटातील जनतेला मोठा फायदा होईल जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण वेळीच लक्ष द्यावे अन्यथा प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन छेडावे लागेल. येत्या 9 आगस्ट या क्रांती दिनापासून तीन दिवसांचे उपोषण या मागणी संदर्भात करणार असल्याचा इशारा गजू कुबडे यांनी दिला यानंतरही मागणीवर विचार न झाल्यास प्रहारच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरोग्य विभागाला गजू कुबडे यांनी निवेदनातून दिला.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे हिंगणघाट तालुका प्रमुख जगदीशभाऊ तेलहांडे, सुरज कुबडे, मोहन पेरकुंडे, राजेश लखाणी, अमोल रामगुंडे, धीरज नंदरे, किशोर देवढे,पवन वाघमारे, अमोल धारने, संतोष जोशी, सुधीर मोरेवार, राजेश तांदुलकर, प्रशांत आवारी भूषण कुंभारे, गोलू कुंभारे, शांताराम तराळे, विक्की सोनकुसरे, गोलू उजवणे, पिंटू वडतकर,अमोल पोतदार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते