
वर्धा : येरणगावात मोकाट श्वानाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवशी चार व्यक्तींसह सहा जनावरांचे लचके तोडल्याने गावात भ्रीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये एका चार वर्षीय बालकाचा ही समावेश असून सध्या बालकावर जिल्हा सामान्य रु्णालयात उपचार सुरु आहे.
दोन दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने काही लहान मुले घरासमोर खेळत होती. यादरायान आलेल्या मोकाट श्वानाने गौरव दीपक बरडे या चार वर्षीय बालकावर हल्ला चढविला. या बालकाचे लचके तोडल्याने नागरिकांनी धाव घेताच श्वास पसार झाला. जखमी झालेल्या गौरवला लागलीच सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.
यासोबतच आणखी तिघांनाही या श्वानाने चावा घेतला आहे. इतकेच नाही गावातील सहा जनावरांचेही लचके तोडल्याने या मोकाट श्वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून केली होती. परंतु त्याचा बंदोबस्त न झाल्याने श्वानाने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता बालकांसह नागरिकांनाही घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रस्त्याने दुचाकी घेऊन जाणाऱ्यांवर ही श्वान चाल करुन जात असल्याने भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी या श्वानाचा बंदोबस्त करण्याची म्रागणी नागरिकांकडून होत आहे.