वर्धा : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, अशी मागणी विदर्भ इंटकने मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांना निवेदनातून केली.
नागपूर येथे मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू झाला आहे. तेथे अनेक अभियंते, कामगार तसेच विविध विभागांमध्ये अनेक कर्मचारी कामत करीत आहेत. मात्र, या प्रकल्पामध्ये काम करणारे परप्रांत, राज्यातील आहेत. स्थानिक पदवीधर रोजगारापासून वंचित आहेत. शासन निर्णयानुसार ८० टक्के कर्मचारी हे स्थानिक असणे गरजेचे असताना हा नियम पायदळी तुडविला जात आहे.
विदर्भातील सुशिक्षित बेरोजगारांना या प्रकल्पामध्ये योग्यतेनुसार काम देण्यात यावे, अशी मागणी विदर्भ इंटकच्या अध्यक्ष अर्चना भोमले यांनी केली. यावेळी जिल्हा इंटक युवा अध्यक्ष श्रीकांत धोटे, नागपूर जिल्हा इंटक अध्यक्ष छाया जीवने, शहर अध्यक्ष नेहा कुंभलवार, विधा निवल, लता भोमले आदी उपस्थित होते.