अग्रिशस्त्र बाळागणाऱ्यांना अटक! तिघांकडून बंदुकीसह सात काडतूस जप्त

वर्धा : अवैधरित्या बंदूक बाळगून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या तिघांना तळेगाव (श्या.पंत.) पोलिसांनी अटक केली. ही कारवाई उड्डणपुला खालील रस्त्यावर करण्यात आली. जराबिरसिंग मुलकसिंग बावरी, करणसिंग जेलसिंग उर्फ लहरीसिंग जुनी, मलींदरसिंग दिलीपसिंग जुनी सर्व रा. काकडधरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हे तिघे अवैधरित्या बंदूक घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांना अटक करीत त्यांच्याकडून बरमार गन (अग्रिशस्तर) तसेच सात काडतूस असा एकूण १५ हजार रुफ्यांचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय गुन्ह्याची नोद घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here