वर्धा : गोजी रस्त्याची अंत्यत दैनावस्था झाली होती, या रस्त्याने शेतकरी, वाहनचालकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता, मात्र या रस्त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत होते, याबाबत संबंधित विभागाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देऊन रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अशी मागणी करण्यात आली होती. आज संबंधित विभागाकडून निवेदनाची दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीच्या काम सुरवात करण्यात आली आहे. ही माहिती आज २० जुलै रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. कामाला सुरुवात झाल्याने शेतकरी, वाहनचाकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोटफोडे, अमजत पठाण, विशाल सोनाये, विशाल लाडे, अल्पेश नगराळे, शुभम कन्नाके, आनंद बुचे, अनिकेत ठाकरे, शंकर पापल, कादर पठाण, गणेश भिसे, नरेश राऊत, अरविंद जगणकार यांची उपस्थिती होती.