पावसाच्या लपंडावामुळे लागला ‘स्वच्छ धाम’ उपक्रमाला ब्रेक

वर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील तब्बल २० गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणाऱ्या धाम नदीच्या पुनर्जीवन अंतर्गत येळाकेळी येथील पिकअप वेअरपासून ते काचनूर या सुमारे २६ किमीच्या धाम नदीतून वनस्पतीसह गाळ काढण्याचे काम जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.

पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी येळाकेळी शिवारात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पण सुमारे १८ हजार घनमीटर गाळ काढल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने तसेच अजूनही थांबून थांबून पाऊस सुरू असल्याने ‘स्वच्छ धाम’ या उपक्रमाला सध्या ब्रेक लागला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा एकदा नव्या जोमाने गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here