

वर्धा : कर्जबाजारीपणाला कंटाळून कारंजा तालुक्यातील मोर्शी या गावातील वसंत महादेव भुसारी या युवा शेतकऱ्याने, स्वतःचे शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
आज सकाळी विहिरीचे काठावर चपला दिसून आल्यात शोध घेतला असता विहिरीत वसंतरावचे प्रेत सापडले. सकाळी बैल व गुरेढोरे पाणी पिण्यासाठी सोडले नाही चारापाणी पण करण्यांत आले नव्हते आणि वसंत भुसारी पण घरी आले नव्हते नेहमी प्रमाणे शेतातील गोठ्यात झोपले असावे असे पत्नीला वाटले. पण गोठ्यावर जाऊन पाहिले असता तेथेही नव्हते, म्हणून शोधाशोध सुरू झाली. शेतातील विहिरीत प्रेत दिसून आले .
वसंतराव कडे २ एकर कोरडवाहू शेती होती, बँक ऑफ इंडियाचे कर्ज आहे, मागील वर्षी नापिकी झाली, या वर्षीचे पेरलेले बियाणे निघाले नाही, कर्ज परतफेड करता येणार नाही, या आर्थिक विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती मिळाली. त्यांच्या मागे पत्नी आणि एक १४ वर्षाचा तर दुसरा १० वर्षाचा मुलगा आहे. संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कारंजा पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.