वर्धा : गोजी रस्त्याची अंत्यत दैनावस्था झाली आहे, या रस्त्याने शेतकरी, वाहनचालकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्डयामुळे अनेकांचे याठिकाणी अपघात ही झाले, या जीवघेणे रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सात दिवसात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मनसेच्या स्टाईलनी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
सध्या पावसाळा सुरु असल्याने खड्डयात साचून असलेले पाणी वाहनचालकांना दिसून येत नसल्याने अनेकांना या जीवघेणे खड्डयातून वाट काढावी लागत आहे, या रस्त्याची दुरुस्तीसाठी अनेकदा संबंधीत विभागाला निवेदन देण्यात आले, मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत आहे. येत्या सात दिवसात रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली नाही, तर मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करनार असल्याचे यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोटफोडे यांनी सांगितले.
यावेळी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोटफोडे, अमजत पठाण, विशाल सोनाये, विशाल लाडे, अल्पेश नगराळे, शुभम कन्नाके, आनंद बुचे, अनिकेत ठाकरे, शंकर पापल, कादर पठाण, गणेश भिसे, नरेश राऊत, अरविंद जगणकार यांची उपस्थिती होती.