वर्धा : पवनार गाव हे लोकसंख्येने मोठे असून येथील गावठी दारू काढणे व विक्री सुरु आहे, तसेच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालण्यासाठी पोलिस चौकी देण्यात यावी, अशी मागणी अखिल तेली समाज संघटनेची वतीने आज शुक्रवारी ९ जुलै रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पवनार गाव हे नागपूर महामार्गावर लागून असल्याने येथील मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते, तर याच ठिकाणी अपघातात झाले आहे. या यादृष्टीने पवनार येथील पोलीस चौकी देण्यात यावी, अशी मागणी अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सेलू तालुका अध्यक्ष रितेश पाहुणे, तालुका उपाध्यक्ष गणेश हिवरे, किशोर सोनटक्के, दादाजी हिवरे, चंदू वाघमारे, मनीष हिवरे, किशोर सोनटक्के, लक्ष्मण उमाटे, सचीन धांदे, सौरभ हिवरे आदीची पदाधिकारी उपस्थिती होती.