पुलगाव : मुलांचे अपहरण करण्याची धमकी देत वीटभट्टी व्यावसायिकाला ४० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना पुलगाव येथे घडली होती. याप्रकरणात पुलगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. यापैकी एका आरोपीला सूरत येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१२ जून रोजी वीटभट्टी व्यावसायिक किशोर चुन्नीलाल कल्पे याच्या मोबाइलवर अज्ञातांनी धमकी देत कराची येथून बोलत असल्याचे सांगत ४० लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिली होती. याबाबत त्यांनी पुलागाव पोलिसात तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रगटीकरण पथकाकडे सोपविला असता कोणताही सबळ पुरावा नसताना गुजरात राज्यातील सूरत येथून आरोपी निकुज वजुभार्ई डोबरिया यास अटक केली.
त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने पुलगाव येथे राहणाऱ्या त्याच्या मित्राने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिसांनी पुलगाव येथून ही. कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुलसिंग पाटील, ठाणेदार रवींद्र गायकवाड़ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दहिलेकर, राजेंद्र हाडके, संजय पटले, पंकज टोकोणे, महादेव सानप, शरद सानप, सचिन बागडे यांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.