वर्धा : कोरोना काळात शाळा, महाविद्यायाकडून पालकांना फी भरण्याकरीता तगादा लावन्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेकांचे रोजगार गेले, यामुळे सध्या पालकांना त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे कठिण होत आहे. यातच महाविद्यालयाकडून पालंकांना फी भरण्याकरीता तगादा लावला जातं आहे. याकडे केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी वर्धा जिल्हा युवक इन्टक काँग्रेसने जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या काळात विद्यापीठाचे शिक्षण घेणे जास्तच अवघड झाले आहे, यातच विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक्ष शुल्क आकारले जात आहे. या गंभीर संकटाचा विचार केंद्र आणि राज्य सरकारने करून त्वरित विद्यार्थी व पालकाना दिलासा देऊन सरसकट पुर्ण शैक्षणिक्ष शुल्क माफ किवा 50% तर शैक्षणिक शुल्क भरून विद्यार्थ्यना व पालकाना आर्थिक दिलासा दयावा. परिक्षा शुल्क माफ करण्यात यावे. फी भरली नसल्यामुळे विद्यार्थ्याला ऑनलाइन क्लास मधून बाहेर काढू नये, आदी माग्ण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.
यावेळी वर्धा जिल्हा युवक इन्टक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत धोटे, विदर्भ प्रदेश इन्टक अध्यक्ष अर्चना भोमले, जिल्हा संघटक अविनाश सेलूकर, वर्धा शहर अध्यक्ष कांग्रेस कमिटी सुधिर पांगुळ, पंकज इगोले, शहर संघटक विशाल हजारे आदीची उपस्थिती होती.