
वर्धा : जिल्ह्यातील सालई (पेवठ) या खेडेगावातील रहिवासी विशाल दिलीप पाटील या युवकाला उत्तर प्रदेश येथील ठाणा जनपद मधुबन मठा येथील पोलिसांनी पाठविलेली नोटीस प्राप्त झाली असून त्याला ठाण्यात उपस्थित न राहिल्यास अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, युवकाने याबाबत माझा काहीही संबंध नसून मी असला कुठलाही व्यवहार केला नसल्याचे युवकाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली आहे.
प्रात माहितीनुसार, उत्तरप्रदेश येथील ठाण जनपद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार सिंह यांचे पत्र सालई येथील विशाल पाटील याला प्राप्त झाले. त्या पत्रात आधारकार्डच्या माध्यमातून २ लाख ६८ हजार रुपयांची धोकाधडी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध ४१९, ४२०, ४०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद आहे. मात्र, विशालच्या म्हणण्यानुसार या घटनेशी माझा काहीही संबंध नसल्याचे त्याने सांगितले. मात्र, एकदा माझ्या मोबाईलवर तुम्हाला लकी ट्रॉमध्ये गाडी लागली असल्याचे सांगितल्याने मी फक्त आधारकार्ड क्रमांक सेंट केला होता, असे त्याने सांगितले. याप्रकरणी विशालने पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेत तक्रार दिली असून न्यायाची मागणी करण्यात आली आहे.
असे आहे प्रकरण…
सत्यम मोर्या आणि संतोष मोर्या यांची ऑनलार्डन पद्धतीने फसवणूक झाली होती. त्यांनी याबाबत विशाल पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार प्रधुबन पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार विशालवर गुन्हा दाखल केला. विशालला ठाण्यात उपस्थित राहण्याची नोटीस पाठविली होती.
यूपी पोलिसांनी तपासली कागदपत्रे
सेलू पोलिसात विशालला यूपी पोलीस शिपायासमोर हजर करण्यात आले. त्यांनी विशालचे आधारकार्ड, पॅनकार्ड आदी दस्तावेजांची तपासणी केली. मात्र, त्याच्या बँक खात्यात मोठा आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे समजले. पोलिसांनी त्याला नोटीस दिली. पण, वारंवार फोन करुन चोकशीसाठी बोलाविण्यात येत असल्याने तो मानसिक तणावात आहे. विशालने वकिलामार्फत पोलिसांना नोटीस देऊन चोंकशीसाठी वर्धा येथील गुन्हे शाखेत येण्यास सांगितल्याची माहिती आहे.