वर्धा : लग्नात आंदण कमी आल्याचे टोमणे मारुन विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत माहेरून १० लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावल्याने आष्टी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विवाहितेचे लग्न हरीश अग्रवाल याच्याशी २०१९ मध्ये झाले होते. मात्र, काही दिवसांनी सासरच्यांनी आंदन कमी मिळाल्याचे टोमणे विवाहितेला मारून वडिलांकडून महागड्या वस्तूची मागणी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होते. विवाहितेला सप्टेंबर महिन्यात माहेरून १० लाख रुपये आणण्यास सांगितले. जर पैसे आणले नाही तर तुला घरात राहू देणार नाही, तुला पागल दाखवून घटस्फोट देखील देऊ शकतो. असे म्हणत धमकी दिली. दरम्यान विवाहितेच्या वडिलांनी १५ हजार रुपये दिले.
त्यानंतर २०२० मध्ये लॉकडाऊन लागल्याने विवाहिता माहेरीच होती. तिच्या पतीने पगार झाला नसल्याने तिच्या वडिलांकडून २० हजार रुपये घेतले आणि विवाहितेस घरी घेवून आला. मात्र, त्यानंतर देखील विवाहितेला पैश्यासाठी तगादा लावत होता. तसेच त्यांनी मे महिन्यात विवाहितेच्या वडिलांना १० लाख रुपयांची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर तुमच्या मुलीला घेऊन जा, असे म्हटले दरम्यान वडिलांनी विवाहितेस घरी आणले.
विद्यमान न्यायाधीश प्रथम श्रेणी न्यायालयाकडे प्रकरण प्राप्त झाल्याने न्यायालयाच्या आदेशावरुन याप्रकरणी आष्टी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या घरगुती कलहातून विवाहितेचा छळ केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, एकमेकांना समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.