वर्धा : कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम सुरू करण्यात येत आहे. २१जून ते१ जुलै या कालावधीत महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर देऊन प्रचार, प्रशिक्षण व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
२८ जून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, २९ जून दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, 3० जून जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांच्या कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १ जुलैला कृषी दिनासोबतच मोहिमेचा समारोप होईल.
कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग मिळून या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणार आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधन तंत्रज्ञान, अद्ययावत कृषी तंत्रज्ञान या मोहिमेत प्रसारित करण्याचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती ब्लॉग स्पॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
कृषी विभागाच्या या कृषी संजीवनी कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.