बाभूळगाव वागदा येथे सुरू होती गांजा विक्री! पोलिसांत गुन्ह्याची नोंद

आर्वी : तालुक्यातील बाभूळगाव वागदा येथे छुप्या पद्धतीने गांना विक्री होत असल्याची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी छापा टाकून एकास ताब्यात घेत ज्याच्याजवळून २७० ग्रॅम गांजा जप्त केला. अनिल सुरेश झोडे (३८), रा. बाभूळगाव असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने दोन दिवसीय पोलीस कोठडी ठोठावली आहे.

आरोपी अनिल झोडे याच्या ताब्यातून २७० ग्रॅम गांना जप्त केल्यावर त्याच्याविरुद्ध आर्वी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत त्याला अटक केली. अटकेत असलेल्या अनिलला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. ही कारवाई ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात देवानंद केकन, योगेश चाहेर, अतुल भोयर, पांडुरंग फुगणार, भूषण निघोट, राहुल देशमुख यांनी केली. चिल्लर गांजा विक्रेता पोलिसांच्या गळाला लागला असला तरी गांजा तस्करांची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here