

वर्धा : लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय पीडितेला दारू पाजून तिच्यावर वारंवार अत्याचार करून तिचे विवस्त्र फोटो मोबाईलमध्ये काढून त्यानंतर लग्नास नकार दिल्याची घटना सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
पोलीस सूत्रानुसार, पीडितेच्या आत्याने पीडितेसाठी लग्नाचे स्थळ सुचविले होते. तिच्या आत्याच्या चुलत पुतण्यासोबत पीडितेचे लग्न व्हावे, अशी आत्याची इच्छा होती. त्यानंतर पीडितेला बघण्याचा कार्यक्रम आटोपला. काही दिवसाने पीडिता घरी असताना युवकाने तिच्या मोबाईलवर फोन करून पाण्याच्या टाकीजवळ येण्यास सांगितले. दरम्यान, पीडिता तेथे भेटण्यास गेली असता त्याने तिला मास्टर कॉलनीतील त्याच्या खोलीवर नेत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.
१५ जून रोजी पुन्हा त्याने फोन करून भेटण्यास बोलाविले. पीडिता त्याला भेटायला गेल्यावर तो पुन्हा तिला खोलीवर घेऊन गेला. तेथे तिला दारू पाजली आणि अत्याचार केला. १९ जून रोजी आत्याने पीडितेच्या आईला फोन करून सांगितले की, मुलाने लग्नास नकार दिला, हे ऐकताच पीडितेच्या पायाखालची वाळूच सरकली. अखेर पीडितेने याबाबतची तक्रार सावंगी पोलिसात दिली. पोलिसांनी याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
पीडितेचे मोबाईलमध्ये काढले विवस्त्र छायाचित्र
युककाने मोबाईलमध्ये पीडितेचे विवस्त्र छायाचित्र काहून ते मित्राला पाठवायचे आहे, असे सांगितले. त्याच छायाचित्राच्या आधारे तिला धमकावून वारंवार अत्याचार करीत होता. आरोपीने युवकाने लाग्नास नकार दिल्यानंतर पीडितेन थेट सावंगी पोलीस स्टेशन गाठले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पीडितेने केला आतमहत्येचा प्रयत्न
युवकाते लग्न करण्यास नकार दिल्यानंतर हा धक्का पीडिता सहन करू शकली नाही, तिने विषारी औषध प्राशन करून आतमहत्या करण्याचा प्रयल केला, पीडितेच्या आर्डने तिला तत्काळ सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि पीडितेने याची तक्रार दिली.