सतीश खेलकर
वर्धा : नागरिकांच्या सोयीसाठी कोविड -१ ९ महामारीच्या काळात परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाइन पद्धतीने जारी करण्याची प्रणाली सुरू केली आहे. या कार्यप्रणालीचा अवघ्या चार दिवसांतच बोजवारा निघाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवारांऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.
वास्तविक केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहित केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा उद्देश वाहनचालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व होणेण हा आहे. मात्र या लोकाभिमुख सुविधेचा राज्यात गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या ऑनलाइन सुविधांचा गैरवापर करणाऱ्या अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्ती यांच्यावर आवश्यक ती पोलिस कारवाई करण्याच्या सूचना संबंधित प्रादेशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात देण्यात आल्या आहेत. तसेच दोषी अर्जदार हा मोटर वाहन अनुज्ञाप्ती धारण करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशी कारवाई करण्याच्या सुचना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आल्या आहे.
पोलिस कारवाईचीही तयारी
महा ई – सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल व इंटरनेट कॅफे सुविधेचा गैरवापर करतील, अशा संस्थांविरुद्ध पोलिस कारवाई तर केली जाईल. पण, या व्यतिरिक्त महा ई – सेवा केंद्राबाबत जिल्हाधिकारी मोटार ड्रायव्हिंग स्कूलबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व इंटरनेट कॅफेविरुद्ध पोलिस विभाग ( सायबर सेल ) यांना आवश्यक ती पोलिस कारवाई कारवाई करण्याच्या सूचना आहे.
- शासनाने सुरू केलेल्या या प्रणालीचा गैरवापर होत असल्याचे पुढे आले आहे. अर्जदाराच्या नावावर कोणी दुसराच चाचणी देत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे विभागाकडून अशा अर्जदारावर करवाई करण्याच्या सूचना आहेत.
- -विजय तिराणकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा