
वर्धा : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मनसे अध्यक्ष, राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मनसे वर्धा जिल्हा अध्यक्ष अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर यांच्या नेतृत्वात 14 जुन रोजी आलोडा बोरगाव, पवनार, वरुड, वानरविरा, देवनगर, क्षिरसमुद्रपुर, उमरी, महाकाळ येथिल गरीब शेतकऱ्यांना कपासी व सोयाबिन चे बी-बियाणे व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सेलु ग्रामिण रुग्णालय व सेलु पोलिस स्टेशन येथील कोरोना योद्धांना मास्क व स्टिमर मशीन वितरित करण्यातआले.अशा प्रकारे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करुन सेलु शहरातिल काही भागात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करुन व सेलु ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करुन मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर म्हणाले की,जिल्हातील कोणत्याही जनतेचे प्रश्न असो किंवा गोरगरीब जनतेची समस्या असो त्यांना न्याय मिळवुन देण्याचा मी सैदव प्रयत्न करील. तसेच विद्यार्थांचे शाळा,महाविद्यालय व विद्यापीठातिल शैक्षणिक समस्या,शासकीय कार्यालयातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न निस्वार्थपणे सोडवु असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.डाॅक्टरांनी रुग्णांची मनोभावे सेवा करुन त्यांची काळजी घ्यावी,असा महत्वपुर्ण सल्ला त्यांनी दिला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर ,सेलु पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनिल गाडे, पीएसआय नितीन नलवडे, पीएसआय सुरेन्द्र कोहळे, पो. हवालदार धनराज सयाम, वामन धोटे, राजु कौरती, अनिल भोवरे,राजु पात्रे, विक्रम कायमेघ तसेच सेलु ग्रामिण रुग्णालयातिल डाॅ. पल्लवी वांदिले, डाॅ. पराग शिंनगारे, संजय गांडोळे तसेच खाजगी रुग्णालयातील डाॅ. अरविंद डोळसकर, डाॅ. प्रविण कापसे, डाॅ. रज्जत पाटिल, तसेच शेतकरी दिलीप बाळबुधे, गजानन राऊत, सचिन धांदे, नानु बाळबुधे,प्रविण घुमडे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी राहुल भेंडे, रोशन कोंबे, ओम मिश्रा, हरीष भस्मे, नितीन देवरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.