

वर्धा : शहरातील शिवाजी चौक ते बजाज चौकापर्यंत गटार योजनेच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर खोदलेल्या जागेत चुरी भरण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी माती कायम असल्याने पावसामुळे चिखल होऊन अपघाताची प्रमाण वाढले आहे.
गुरूवारी दुपारी आलेल्या पावसाने या रस्त्यावर चार दुचाकीस्वार पडून अपघात झाला. यात दोघांना जबर मार लागला आहे. ठाकरे मार्केट समोर झालेल्या या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. नगर पालिकेने कंत्राटदारांच्या माध्यमातून तात्काळ दुरूस्ती करण्याची गरज आहे. अन्यथा येत्या दिवसात मोठी दुर्घटना घडावला वेळ लागणार नाही