वर्धा : शहरातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु असतांना एक इसम संशयास्पद स्थितीत मिळून आला. सतीश उर्फ शेम्बड्या बाबाराव मडावी, वय 23 वर्ष रा. दादाबादशा नगर, राळेगाव जिल्हा यवतमाळ असे सांगितले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने वर्धा जिल्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४ गुन्हे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये एकूण ५ गुन्ह्याची कबुली दिली.
त्याचेकडून १) भारतीय चलनाच्या ५००/- रू चे ४२ नोटा, २) भारतीय चलनाच्या १०० रू.चे ११० नोटा ३) एक नविन निळ्या रंगाचा रेडमी कंपनिचा अॅन्ड्राईड मोबाईल, ४) एक लोखंडी रॉड असा एकूण किंमत ४२,०२०/- रु. चा नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली.
पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन वर्धा शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांचे निर्देशांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, पोलीस अंमलदार गजानन लामसे, यशवंत गोल्हर, पवण पन्नासे, राजेंद्र जयसिंगपुरे, अभिजित वाघमारे, मनिष कांबळे, गोपाल बावनकर, नवनाथ मुंडे , दिनेश बोथकर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.