वर्धा : अवैधरीत्या गांजा बाळगून त्याची विक्री करणार्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. फुले वॉर्ड येथे ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींच्या घरातून ७७३० किलो असा ७१ हजारांचा गांजा जप्त केला. ही कारवार्ड हिंगणघाट पोलिसांनी केली.
पोलिसांना पिळालेल्या माहितीनुसार, विजय उर्फ बाबा माणिक कोथरे याच्या निवासस्थानी छापा मारला असता घरात लाल रंगाच्या प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये ४,३७० किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करीत विजय कोथरे, राकेश कोथरे यास अटक करीत हिंगणघाट ठाण्यात गुन्हा दाखल केला. शहरात सध्या गांजाविक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु झाले आहे.