वर्धा : महाराष्ट्र राज्य शासन व परिवहन महामंडळ प्रशासनाकडून परिवहन महामंडळाचे खासगीकरण होत आहे. वा खासगीकरण विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्यावतीने बस आगारात काळी फित लावून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला बामसेफच्या अन्य १९ सामाजिक संघटनांचा सहभाग होता. आंदोलकांच्यावतीने व्यवस्थापकाच्या आणि तहसीलदाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी एस. टी. कर्मचारी संघाचे, वर्धा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वासनिक, संजय कांबले, राहल वाहाने, चंद्रकांत शिंगणापुरे, रवी जाधव, विपिन मानवटकर, अनवर अली, पी. एल. पुडके उपस्थित होते. यावेळी शशिकांत गजभिये, हार्शपाल मेंढे, अविनाश मेदाम, वकील संघाचे अक्षय रंगारी, मुस्लीम मोर्चाचे गुलाब खा पठांन, शेख जाहीद, बहुजन क्रांती मोर्चाचे मंगेश वानखेडे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय कुंभारे, तलाठी संघटनेचे पाडेल यांनी जाहीर समर्थन दिले.