मयुर अवसरे
विजय गोपाल : येथील गावालगत असलेल्या नाल्यावर गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरी बंधारा आहे परंतु हा कोल्हापुरी बंधारा फार जुना झाला असून त्यामुळे या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी साचणे ऐवजी पाणी वाहून जात आहे.
या कोल्हापूरी बंधाऱ्याच्या अनेक पाट्या चोरीला गेलेले आहे हा कोल्हापुरी बंधारा जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन पाटबंधारे विभाग सिंचन विभाग जिल्हा परिषद वर्धा यांच्या अखत्यारीत येतो या कोल्हापुरी बंधाराच्या पाट्या पावसाळा संपलाच्या अगोदर टाकण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते परंतु पाट्या टाकण्याचे चोरी गेले असल्याकारणाने व पाट्या टाकण्याकरीता तज्ञ कारागीर नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रवाह पाट्या टाकल्यावर सुद्धा सुरूच राहतो.
त्यामुळे येथे पाणी राहणे एवजी पाणी वाहून जातील पाणी वाहून गेल्याने लवकरच हा नाला कोरडा होतो या नाल्यात पाणी शिल्लक राहत नाही त्यामुळे परिसरातील जनावरांची आणि नाल्याच्या सभोवताली शेतकऱ्यांना करिता पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना त्याकरिता पाण्याची व्यवस्था व्हावी या अनुषंगाने या ठिकाणी कोल्हापुरी बनणाऱ्या त्या जागेवर नवीन सिमेंट बंधारा करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
येथे नवीन सिमेंट बंधारा झाल्यावर अनेक शेतकऱ्यांच्या शेताला पिकाला पाणी मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर होईल म्हणजेच विकास होईल म्हणून येथील शेतकऱ्यांनी या नाल्यावर सिमेंट बंधारा करावा अशी मागणी केली आहे याकडे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.